औरंगाबाद:- दि.१३ ऑक्टो.(दीपक परेराव) औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला शहर सामोरे जात असताना शहरात अनाधिकृत नळ जोडणी संबंधि मनपाने वारंवार जनजागृती करून नागरिकांनी आपले नळ अधिकृत करून घेण्यासाठी योजना राबवली तरीही काही नागरिक व व्यवसायकांनी नळे अनाधिकृतच ठेवली .

त्यामुळे मनपाचे पाणी पुरवठा नियोजन विस्कळीत होतेच त्या बरोबर मनपाचा महसूलचे नुकसान होत होते.त्यामुळे मनपा ने आता अनधिकृत नळ कनेक्शन विरुद्ध धडक कारवाई करून नळे बंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

आज गादिया विहार रोड येथील एकूण 22 नळ कनेक्शन बंद करण्यात आली. तसेच मुकुंदवाडी जवळील ऐ वन हॉटेल येथील1 नळ कनेक्शन बंद करण्यात आले. या पथकातील उपायुक्त राहुल सूर्यवंशी ,महेश चौधरी (उपअभियंता),के जे मिस्कीन (कनिष्ठ अभियंता), राहुल मालखेडे (कनिष्ठ अभियंता), एम डी गोरे (दुय्यम आवेक्षक), सुशिल कुलकर्णी (कनिष्ठ अभियंता), अंकुश वाघ (कनिष्ठ अभियंता), कल्याण सातपुते (कनिष्ठ अभियंता) आदींनी ही कारवाई केली.