रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्मृतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने जिल्हा स्म्रावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.त्याप्रमाणे माहे ऑक्टोबर 2022 रोजी चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत आयोजित केला आहे.
त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने, 'रत्नागिरी जिल्हयातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनव्दारे संपर्क करुन 17 ऑक्टोबर 2022 रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या 1077 या टोलफ्री क्रमांकावर दुपारी 12.000 ते01.00 या वेळेत त्यांचे निवेदन/ अर्ज नोंदविता येतील असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती रत्नागिरी यांनी कळविले आहे.