औरंगाबाद: दि. 13 ऑक्टो.(दीपक परेराव) औरंगाबादचे विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथे करण्यात आली आहे तर औरंगाबाद महापालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आता औरंगाबादचे जिल्हाधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे.
राज्य शासनाने बुधवारी 20 आय एएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये औरंगाबादचे सुनील चव्हाण आणि आस्तिक कुमार पाण्डेय यांचा समावेश आहे. 9 डिसेंबर 2019 मध्ये आस्तिक कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात सत्तांतराचे महानाट्य सुरु असतानाच तत्कालीन ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची बदली करुन, त्यांच्याजागी डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून पांडेय यांच्याकडे कोणतेच पद नव्हते.