अवैध दारुची वाहतुक करणाऱ्यास पडकले
"६४ हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल जप् उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांची कारवाई"
पाचोड(विजय चिडे) अवैध देशी दारूची दुचाकीवरून वाहतूक एक व्यक्ती करत असल्याची माहिती (दि.१२)रोजी पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकास मिळाली असता त्यांनी तात्काळ नांदर ता,पैठण फाट्यावर सापळा रचून महेश कारभारी जायकर (वय२४वर्ष) रा. टाका डोणगाव ता.अंबड जि.जालना याला ताब्यात घेतले असुन ६४ हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार,नांदर फाटा येथून एक व्यक्ती हा दुचाकी वाहनांवर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जात आहे.अशी माहीती गुप्तबातमीदारामार्फत भेटली असता सायंकाळी साडे वाजेच्या सुमारास पैठण ते पाचोड रोडवर नांदर फाटा येथे सापळा लावला. तेव्हा बातमी मिळालेल्या वर्णनाचे संशयीत व्यक्ती व लाल काळ्या रंगाची दुचाकी येतांना दिसल्याने त्यास हात दाखवुन थांबल्यावर दुचाकीची पाहणी केली असता चौदा हजार चारशे ची देशी दारू मिळून आली असून यात एम.एच २१ एम. एम ९८२५ हि गाडीही जप्त करण्यात आली असून एकूण,६४ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन ही कारवाई पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोह, शिंदे, पो.ना सचिन भुमे, पो.ना संतोष तोडकर, पो.अं अरुण जाधव आदीने पार पाडली आहे.