जिंतुर/प्रतिनीधी

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

तालुक्यातून जाणारे सर्व महामार्ग वरील रस्त्यांची दयनीय अवस्था असून जिंतूर ते औंढा मार्ग जिंतूर ते शेनगाव मार्ग व शहरातील मुख्य रस्त्या मध्ये खड्डेच खड्डे झाले आहे 

यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेक प्रवाशी व चालकांना आपले जीव गमवावे लागले आहे काहींना कायमचे अपंगत्व आले आहे शासकीय बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णा च्या झोप असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे

जिंतूर ते आडगाव महामार्ग क्रमांक एन.एच. ७५२ जिंतूर ते येलदरी सेनगाव महामार्ग क्रमांक एम. एच ७५२ के. व शहरातील मुख्य रस्ता असलेले तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डेच खड्डे व मोठे मोठे खड्डे झाले आहे रस्त्यावर दुचाकी चार चाकी वाहन तर सोडाच साधे पायदळी चालणे नागरिकांना कठीण झाले आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचले आहे रात्रीच्या वेळी प्रवास करताना छोट्या मोठ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांचे गावातून आजारी किंवा महिलांना प्रसूतीसाठी जिंतूरकडे येण्यास मोठ्या अडचणीला सुमारे जावे लागत आहे 

खड्ड्यांची दुरूस्तीच्या नावाखाली गुत्तेदार व शासकीय बांधकाम विभागातील अधिकारी यांचे चांगभले होत आहे हे खड्डे भरून घेण्यासाठी अनेकवेळा सामाजिक संघटना व विविध पक्षांच्यावतीने अंदाेलन करण्यात आले मात्र जशास तशी परिस्थिती सध्या तरी आहे याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे