दापोली : खेड- रुखी ही बससेवा ही गेले कित्येक वर्षे नियमित सुरु होती. कोरोना काळात सगळ्याच बस सेवा बंद होत्या. सदरची बस ही खास करन शालेय विद्यार्थ्यांसाठी व इतर प्रवाशांसाठी अत्यावश्यक मागील कित्येक वर्षे फक्त रविवार व बॅक होलिडेज त्याच दिवशी बंद असून इतर सर्व सुट्टया बस चालू होती. परंतु खेड आगाराच्या अनागोंदी कारभारामुळे सदरची बस सतत अनियमित असून बऱ्याच वेळा रद्दही करण्यात येते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानास तसेच वयोवृध्द प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबीस खेड आगार जवाबदार असल्याचे रखी गावचे माजी सरपंच श्री. हिदायत देसाई यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. सदरच्या बसची वेळ सकाळी १०१० ऐवजी ९४५ ते१००० अशी करण्यात यावी जेणे करुन विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच बस रविवार व बॅक हॉलिडेच्याच दिवशी बंद ठेवण्यात यावी. व इतर गणपती, दिपावली व उन्हाळी सुट्टीत बस सेवा चालू ठेवण्यात यावी कारण दीर्घ सुट्टीत वरच्या वर्गातील मुलांचे वर्ग चालू असतात. तसेच प्रवाशी वर्गाला याचा पायदा होइल तरी सदरची बस पूर्ववत व वेळेत सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं