बीड(प्रतिनिधी) :- बीड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पीकविमा तक्रारी बजाज पीकविमा कंपनीने पेंडिंग पडलेल्या आहेत. तालुक्यातील १५ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीनंतर ओनलाईन केलेल्या तक्रारी पीकविमा कंपनीने रिजेक्ट केलेल्या आहेत, या रिजेक्ट केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांची तक्रार नाकारल्याचे माहीतच नाही यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागणार असून नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे २ वेळा नुकसान होऊ शकते मात्र ऍपवर एकदाच नुकसान भरपाई नोंदवता येत असल्याने शेतकऱ्यांना आता पीकविमा नुकसान भरपाई तक्रारच नोंदवता येणार नसून हि बाब शेतकऱ्यांसाठी खूप तोट्याची असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर यांना शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी निवेदन देऊन सप्रयोग निदर्शनास आणून दिलेली आहे.  

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  बजाज पीकविमा कंपनी शेतकऱ्यांवर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अन्याय करत असून अग्रीम नाकारल्यानंतर शेतकऱ्यांना आता पिकाचे नुकसान होऊनही पीकविमा तक्रार करणे अवघड जात आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाच्या तक्रारी अद्याप कंपनीकडून पेंडिंग ठेवल्या आहेत. त्याच तक्रारी निकाली काढल्या नसल्यामुळे शेतकरयांना आता होत असलेल्या पावसाची तक्रार नोंदवता येत नाही तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार कंपनीकडून विविध कारणास्तव नाकारली गेली आहे याबद्दल कंपनीकडून काहीच मॅसेज येत नसल्याने रिजेक्ट झालेले बीड तालुक्यातील १५ हजार शेतकरी कोण आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच कंपनी ऍप हे फक्त एकाचवेळी तक्रार नोंदवून घेत असल्याने दुसऱ्यांदा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तर शेतकऱ्यांना त्याची नोंद घेता येत नसल्याचे सप्रमाण धनंजय गुंदेकर यांनी कृषी जिल्हा अधीक्षक जेजुरकर यांना निदर्शनास आणून दिले आहे. या अडचणी सोडवल्या गेल्या नाही तर हजारो शेतकरी पीकविमा मदतीपासून वंचित राहू शकतात असे शेतकरी नेते धनंजय गुंदेकर यांचे म्हणणे आहे.  

बीड तालूक्यातील गावोगाव आज पीकविमा जनजागृती अभियान 

बीड तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांमध्ये शेतकरी पुत्र सर्व शेतकऱ्यांना पीकविमा तक्रार करण्यासंबंधी तांत्रिक माहिती देणार असून सकाळी ०८ ते १० या वेळेत गावोगाव जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. पीकविमा संबंधी तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याने नुकसान होऊनही शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित राहत आहे, याच अनुषंगाने दसऱ्या दिवशी सर्व गावच्या एकेक शेतकरी पुत्रास पीकविमा संबंधी तांत्रिक माहिती देत आपल्या गावच्या शेतकऱ्यांना त्यांनी जागरूक करावे असे ठरविण्यात आले होते. शेतकऱ्यांना पीकविमा बाबत सर्व बाजूंनी माहिती व्हावी म्हणून शेतकरी आंदोलन समिती आज दिनांक १३ रोजी जनजागृती अभियान गावोगाव गावसमन्वयकांच्या माध्यमातून राबवत असल्याचे धनंजय गुंदेकर यांनी माहिती दिली आहे.