उस्मानाबाद : तुळजापूर तालक्यातील श्री. तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव नुकता संपन्न झाला.यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवरात्र उत्सवा दरम्यार चोरी, जबरी चोरी इत्यादी गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर मंदीर परिसर व शहरात गस्तीस होते. नवरात्रीदरम्यान पथकाने तुळजापूर पो.ठा. येथे दाखल असलेल्या 1)गुन्हा क्र. 342, 349, 350, 352, 353, 354, 369, 370, 373 /2022 भा.दं.सं. कलम- 392 या जबरी चोरीच्या एकुण 9 गुन्ह्यातील मोबाईल फोन, रक्कम व वाहन असा एकुण 1,10,100 ₹ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 14 आरोपींस अटक केली. 2) भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दाखल गुन्हा क्र. 345, 347, 348/2022 या चोरीच्या 3 गुन्ह्यातील मोबाईल फोन, रक्कम व वाहन असा एकुण 18,600 ₹ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 3 आरोपींस अटक कली. 3)अवैध मद्य वाहतुक, विक्री करणाऱ्या 5 व्यक्तींच्या ताब्यातील देशी- विदेशी व गावठी दारु असे एकुण 53,336 ₹ किंमतीचे अवैध मद्य जप्त करुन त्यांच्यावर महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत 5 गुन्हे दाखल केले. 4)भिक्षा प्रतिबंधक कायदा कलम- 5 अंतर्गत कारवाई करुन 3 व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. 5)फौजदारी प्रक्रीया संहिता कलम- 109 अंतर्गत 70 व्यक्तींविरुध्द तर 41 (1) ड अंतर्गत एका व्यक्तीवर कारवाई करुन त्याच्या ताब्यातून अंदाजे 30,000 ₹ किंमीची मोटारसायकल हस्तगत केली.अशा प्रकारे स्था.गु.शा. च्या पथकाने एकुण 1) सी.आर.पी.सी. कलम- 109 अंतर्गत 70 व्यक्तींवर तर 41 (1)ड अंतर्गत- एका व्यक्तीवर अशा एकुण प्रतिबंधक 71 कारवाया केल्या. 2) भा.दं.सं. कलम- 379, 392 या चोरी- जबरी चोरीच्या एकुण 12 गुन्ह्यातील एकुण 1,28,700 ₹ चा माल हस्तगत करुन 17 आरोपींना अटक केली. 3) म.दा.का. अंतर्गत एकुण अंदाजे 53,336 ₹ किंमतीचे अवैध मद्य जप्त करुन 5 अव्यक्तींवर गुन्हे दाखल केले. 4)भिक्षा प्रतिबंधक कायद्यांतर्गत एकुण 5 व्यक्तींवर गुन्हे दाखल कले.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. शैलेश पवार, मनोज निलंगेकर, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, श्री. जगताप, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, विनोद जानराव, जावेद काझी, प्रकाश औताडे, उलीउल्ला काझी, अमोल चव्हाण, धनंजय कवडे, महेबुब अरब, नितीन जाधवर, अजित कवडे, अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर, रविंद्र आरसेवाड, भालचंद्र काकडे, शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे.

Sponsored

स्वामी विवेकानंद सीनियर सेकण्डरी स्कूल बूंदी (राजस्थान)

प्रवेश प्रारंभ | लगातार 37 वर्षों से सर्वश्रेष्ठ परिणाम देने वाली ज़िले की अग्रणी संस्था | कक्षा नर्सरी से 12 वीं तक | संकाय : कला, विज्ञान, वाणिज्य, कृषि