राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध ठिकाणी शाखा स्थापन करणार , उंबरे
बीड प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आले आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, काशिनाथ जी शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर जी सलगर , मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, व राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, व राष्ट्रीय बीड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शिवाजी चांगण यांच्या मार्गदर्शनाखाली, बीड येथील सामाजिक कार्यकर्ते, तुषार उंबरे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या बीड युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, यावेळी तुषार उंबरे म्हणाले आहेत की, युवकांना सोबत घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे काम बीड जिल्ह्यात वाढवणार ,व माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांचे विचार घरोघरी पोहोचवणार व बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध ठिकाणी शाखा स्थापन करणार व हिमतीने काम करणार, असे आवाहन नूतन राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक बीड जिल्हाध्यक्ष तुषार उंबरे यांनी केले केले, यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका पदाधिकारी जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते,