खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अपघातांची मालिका अदयाप सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी या घाटात तासाभराच्या फरकाने दोन अपघात झाले. गतिरोधकामुळे झालेल्या कंटेनरच्या अपघात कंटेनरच्या मागे असलेला मारुती कारचा चालक केवळ त्याचे दैव बलवत्तर म्हणून बचावला. दोन्ही अपघातांमध्ये मनुष्यहानी टळली असली तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पहिला अपघात भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर झाला. घाट उरणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो ट्रक अवघड वळणावर अनियंत्रित झाला आणि संरक्षक कठडयावर आदळला. या अपघातात क्लिनर जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुसऱ्या अपघात या अपघातापासून केवळ १०० मीटरवर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे घडला. घाट उतरणाऱ्या टँकरने स्पीड ब्रेकरवर स्पीड कमी केला त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाला कंटेनर नियंत्रित करता न आल्याने कंटेनरची टँकरला मागून जोरात धडक दिली. ज्या टँकरला मागून धडक बसली तो टॅक निघून गेला मात्र धडक जोरात असल्याने कंटेनरच्या चालकाची केबिन तुटून रस्त्यावर कलंडली. जेव्हा कंटेनरची टँकरला धडक बसली तेव्हा टँकरच्या बाजूने जाणाऱ्या मारुती कारला टँकर घासत गेला त्यामुळे मारुती कारचेही नुकसान झालें. सुदैवाने कंटेनर रस्तावर कलंडला नाही. या अपघातात बसलेल्या धक्क्यामुळे जर कंटेनर कलंडला असता तर मात्र मारुती कार चालकाचे वाचणे कठीण होते. मारुती कार चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत वाचला.
मंगळवारी सायंकाळी भोस्ते घाटात कंटेनरच्या अपघात झाल्याची खबर कळताच येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी घाटात धाव घेतली. अपघातानंतर महामार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली होती मदत ग्रुपचे सदस्य आणि पोलीस यांनी वन वे ट्राफिक सुरु करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान क्रेन मागवून रस्त्यात कलंडलेला कंटेनर बाजूला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला खेड पोलिसांनी अपघातांची नोंद केली असून खेड पोलीस तपास करत आहेत.