रत्नागिरी : विश्र्वनगर येथील राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते पंकज पुसाळकर यांनी लोक हिताचा विचार करून मुख्याधिकारी यांच्याकडे एक मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी याना दिले आहे.

 या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महावितरण मध्ये दरमहा वीज बिल भरण्यासाठी अनेक लोक येत असता. यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक असतात, महिला वर्ग असतात. लाईट बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. या ठिकाणी कामा निमित्तही ऑफिसला येणाऱ्या बंधू भगिनीना स्वछतागृह नसल्यामुळे गैरसोय होत आहे. त्याचा त्रास आपल्या महावितरण ऑफिस जवळच शेजारी असलेलं श्री अभिजित शशिकांत नागवेकर याना होत आहे. त्यांच्या स्वछतागृहाचा वापर करण्याची मागणी वारंवार केली जाते. सामाजिक भावना बाळगून ते त्याना आपले स्वछता गृह रोज वापरण्यास देत असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. परंतु महावितरण मध्ये स्वछता गृह नसल्यामुळे आज त्याना वैयक्तिक आणि त्याच्या हॉटेल वर जावे लागते. ह्या साठी उपाय म्हणून bio- toilet उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.