पक्ष बांधणीसाठी अमित ठाकरे मराठवाडयाच्या दौर्‍यावर आहेत. काल ते बीडमध्ये दाखल झाले. आज सकाळी त्यांनी शहरातील कंकालेश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले. या वेळी माध्यमाशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, पक्ष बांधणीसाठी मी मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. ज्या विद्यार्थ्यांना, तरुणांना खरच पक्षामध्ये काम करायचे आहे त्यांना पक्ष संधी देणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. या वेळी ठाकरे यांच्या सोबत अनेक मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. ते रात्री बीडमध्ये आले. आज सकाळी त्यांनी बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले. या वेळी माध्यमाशी बोलताना ठाकरे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना, तरुणांना पक्षामध्ये खरच काम करायचे आहे त्यांना पक्ष संधी देणार. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी मी मराठवाड्याच्या दौर्‍यावर असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे यांच्या समवेत मनविसेचेे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव, मोटे, सुमंत धस सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.