बार्टी संस्थेमार्फत दिल्या जाणारी पीएचडी फेलोशिप सारथी व महाज्योतीप्रमाणे सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट लागू करणे बाबत प्रा.नितीन गायकवाड(संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य)
आम्ही सर्व पीएचडी प्रवेशार्थी असून वेगवेगळ्या विषयात संशोधन करण्यासाठी पात्र आहोत तसेच बार्टी कडे फेलोशिप साठी अर्ज केलेले आहेत व बार्टी कडून आम्हाला असे कळविण्यात आले आहे की फॉर्म भरलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार असून त्यातून फक्त दोनशे संशोधक विद्यार्थी निवडले जाणार असून फक्त दोनशे विद्यार्थी फेलोशिप साठी पात्र ठरणार आहेत .
वास्तविक सर आम्ही एसी या कॅटेगरीमध्ये येत असून या कॅटेगरीमध्येच आर्थिक अडचणी असताना व कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सकस व गुणवत्तापूर्ण संशोधन करण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहेत पूर्ण राज्यातून केवळ दोनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप साठी निवड पूर्णतः अन्यायकारक आहे, कारण उर्वरित विद्यार्थ्यांना आपले संशोधन पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा प्रचंड सामना करावा लागणार असून यातून गुणवत्तापूर्ण संशोधन करणे कसे शक्य आहे तसेच यापूर्वी संशोधक विद्यार्थ्यांची निवड २०१७ म्हणजे पाच वर्षांपूर्वी झाली होती पाच वर्षानंतर दोनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप देणे चुकीचे आहे तसेच सारथी संस्थेतर्फे यावर्षी सर्व ८५७ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर झाली आहे व महाज्योती संस्थेतर्फे बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असताना फक्त बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करणे आवश्यक असताना फक्त दोनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करणे चुकीची अन्यायकारक आहे कारण बार्टीच्या विद्यार्थ्यांचा कमी उत्पन्न गट असल्यामुळे फेलोशिप आवश्यक आहे तरी मेहरबान साहेबांना या बाबींचा विचार करून बार्टीच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करावी ही विनंती.