लोणार दिनांक 12 ऑक्टोंबर 2022
यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फार मोठा फटका शेती क्षेत्राला बसला आहे .ऑक्टोबर महिन्यात ऊसतोड कामगार हे ऊस तोडीला बाहेरगावी कामासाठी जात असतात परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची व मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली असून पावसामुळे झालेल्या चिखलात ऊस तोडीच्या गाड्या ट्रक ट्रॅक्टर वाहतूक करता येत नाही म्हणून यावर्षी मोठा परिणाम ऊसतोड हंगाम हा लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे यावर्षी उसाची नोंद जास्त झाली आहे फक्त पाऊस थांबण्याची वाट पाहणे सुरू आहे साखर कारखाने सज्ज झाले आहेत