गेले दोन ते तीन दिवसापासून वाघोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिक ,वाहन चालक तर अनेक ॲम्बुलन्स यांच्यासह शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना देखील बसला, यावेळी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आमदारांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाघोली मध्ये वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.  

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पुण्यातून अहमदनगर, बीड, नांदेड आदी ठिकाणी जाण्यासाठी वाघोली मार्गे पुढे जावे लागते.त्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा फटका आमदार अशोक पवार यांना बसला.आमदार पवार काही काळ वाहतूक कोंडीत अडकले होते.

शेवटी आमदार अशोक पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत केली. त्यावेळी आमदारांसोबत सामाजिक कार्यकर्ते सुनीलचाचा जाधवराव यांनी देखील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना मदत केली.  

 तर दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाघोलीतील स्थानिक तरुणांनी देखील रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी सतपाल सातव पाटील, सनी अन्सारी यांच्यासह काही तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.