औरंगाबाद लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात तिन्ही वीज कंपन्यांच्या परिमंडल कार्यालयासमोर एक दिवस हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय मागासवर्गीय संघटनेच्या नाशिक येथील केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला होता . त्यानुसार संघटनेचे परिमंडल सचिव रवींद्र धनवे यांच्या नेतृत्वाखाली महापारेषण कंपनीच्या हर्सल येथील कार्यालयासमोर आंदोलन केले . या वेळी संघटनेचे माजी राज्य उपाध्यक्ष रोहिदास आल्हाट , स्मित पुनवटकर , सहसचिव प्रशांत धायरे , रोहिणी घनबहाद्दूर , अमित बोडले , वैजनाथ राठोड , प्रशांत मेश्राम , वंदना चव्हाण , सतीश कळेकर , व्ही . एम . चव्हाण आदींची उपस्थिती होती . आंदोलनात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी सहभाग घेतला . > वीज कायदा दुरुस्ती विधेयक २०२२ ला विरोध करणे , धोरणात्मक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व कामगारविरोधी धोरण बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी हसूल येथील महापारेषण परिमंडळ कार्यालयासमोर एकदिवसीय हल्लाबोल आंदोलन करण्यात आले . केंद्र शासनाने संविधान , कामगार व मागासवर्गीयांविरोधात वीज कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे . तसेच वीज कंपन्यांत दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हिताच्या धोरणांची पायमल्ली होत आहे