कन्नड लम्पी या आजाराने रेल , चिंचोली लिंबाजी , नागद , शिवतांडा , पळशी , करंजखेडा , लगडातांडा , उबरखेडा, नागापूर या गावांत आतापर्यंत १७ जनावरांचा लम्पीच्या आजाराने मृत्यू झाला आहे . चिकलठाण येथील ३ , पळशी बड़क १ , रेल १ , करंजखेडा १ जनावरांची तब्येत सध्या गंभीर आहे . त्यांना क्वारंटाइन करून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून उपचार सुरू आहेत . लम्पीची लागण झालेली गावनिहाय जनावरे रेल ४ , चिंचोली लिंबाजी १ , देवळाणा १ , वासडी ३ , नागद १२ , शिवतांडा १५ चापानेर २ , पळशी १६ , नादरपूर ५ , आडगाव पिशोर १ , करंजखेडा ४ , लंगडातांडा ४ , लव्हाळी विटा ३ , हतनूर ३ , खिर्डी ९ , कानडगाव ( वेरूळ ) ५ , रोहिला चिकलठाण ९ , नागापूर ५ , उबरखेडा १, कन्नड या २२ गावांत १०४ जनावरांना लम्पी या संसर्ग आजाराची लागण झाली आहे . १ लाख लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून कन्नड तालुक्यातील १ ९ हजार ७०० जनावरांसाठी ९ ६ हजार लसीचा पुरवठा १८ सप्टेंबर रोजी करण्यात आला . लसीचा पुरवठा होताच १ ९ सप्टेंबरपासून अधिकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहीमेला सुरुवात केली . अधिकारी कर्मचाऱ्यांनी शनिवार , रविवारच्या साप्ताहिकी सुट्या देखील न घेता २१ दिवसांत तब्बल ९ ० हजार जनावरांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण केले . ६ नवीन कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . लसीकरणाच्या राहिलेल्या २७ हजार ७०० जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी अरुण गवारे यांनी दिली . कळंकी येथे लसीकरण करताना पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी . सोबत संजय खंबायते , सुभाष काळे , बाधित जनावरांना क्वारंटाईन करावे तालुक्यात २१ गावात सध्या १०३ जनावरे लम्पी या आजाराने बाधित आहेत . चिकलठाण , रेल , पळशी करंजखेडा या गावातील ६ जनावरे वगळता बाकीची जनावरांना फार गंभीर लक्षणे नाहीत . सध्या सर्व बाधित जनावरांवर उपचार सुरू आहे . ज्या जनावरांवर उपचार सुरू आहे त्या जनावरांना पशुमालकांनी डोंगरात किव्हा अन्य ठिकाणी मोकळे न सोडता काही दिवसासाठी क्वारंटाईन करावे