सिल्लोड : भराडी , शिक्षण हे शाळा , शिक्षक केंद्रित नसावे तर ते विद्यार्थी केंद्रित असावे तरच विद्यार्थी प्रगल्भ होतील , अपेक्षित असा सर्वांगीण शैक्षणीक विकास साधता येईल असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . कलिमोद्दिन शेख यांनी भराडी येथिल ज्ञानविकास विद्यालयात केले . विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधतांना प्राचार्य कलिमोद्दीन शेख म्हणाले की , विद्यार्थ्यांनी दररोजचा अभ्यास पूर्ण करून अवांतर वाचन , खेळ , मनोरंनातमक कार्यक्रम बघावे , देशाला दूर सारून कुटुंब सदश्य , मित्र यांच्याशी गप्पा मारून ज्ञान आत्मसात करावे . जो विद्यार्थी स्वतः प्रश्न तयार करुन आपल्या शिक्षकाकडून उत्तरे जाणून घेतो तो विद्यार्थी अधिक प्रगती साधू शकतो . अधिक भाषा अवगत होतील करिता विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे . फक्त पगारी नोकरी , पैसा देणारा व्यवसाय करता यावा असे विद्यार्थी न घडवता भारत देशाला  सुजलाम सुफलाम करण्यासाठी अत्यावश्यक अशा सर्वांगीण क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थी घडावे म्हणुन प्रयत्न करावा म्हणुन आवाहन केले . यावेळी डॉ . अनंत चौधरी , डॉ . प्रकाश मांटे , ए . बी . पवार गटशिक्षणाधिकारी , श्री आर . डी . फुसे शिक्षण विस्तारधिकारी , प्रकाश शिंदे साधन व्यक्ती . बळीराम गाडेकर साधन व्यक्ती , श्री . रावसाहेब ढवळे विशेषतज्ञ , श्री सुरेश लांडगे समाधान काकडे विशेष शिक्षक , अथर शेख आदी हजर होते . संचलन श्रीमती टाकळकर ए तर आभार वैष्णवी शिंदे यांनी केले . अशोकदादा गरूड शैक्षणीक व सामाजिक समूह सिल्लोड संचलीत ज्ञानविकास विद्यालय वतीने सुष्टी काकडे , मयूरी काकडे , अनुष्का सोनवणे , राजश्री घोंगटे , अनन्या पाटील , वैभवी जोशी , भक्ती राजपूत , रोहीणी खांदवे , अस्मिता शेळके , राजश्री काकडे विद्यार्थिनींनी मान्यवरांचा सन्मान या केला