बीड तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. या पावसासह वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. काल वडवणी तालुक्यातील सतेवाडी येथील 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर डोंगर पट्ट्यातीलच मोहिंगिरवाडी (बोरफडी) येथील महिला शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची घटना आज घडली आहे.

 आज सायंकाळी 05 च्या सुमारास बीड तालुक्यातील बोरफडी नजिक असलेल्या मोहिंगिरवाडी येथील मोहरबाई राजेंद्र जाधव या 45 वर्षीय महिला शेतकरी यांच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून डोंगरपट्ट्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.