औरंगाबाद:- दि.११ ऑक्टो.(दीपक परेराव)न्यू हनुमान नगर गल्ली न.५ येथे जवळपास ७०-७५ घरांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत होता. जेव्हापासून पाईप लाईन झाली तेव्हा पासून आसपास नागरिकांच्या नळाला कमी दाबाचे पाणी येत होते. नागरिकांनी वारंवार तक्रार होती.
परिसरातील नागरिकांनी तसेच माजी नगरसेविका मीनाताई गायके,माजी नगरसेवक आत्माराम पवार,बापू कवळे,अशोक दामले यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेच मनपाचे कनिष्ठ अभियंता अंकुश वाघ यांनी प्रत्यक्ष कामास सुरवात केली.
त्यांनी उपअभियंता महेश चौधरी साहेब, अभियंता मिस्कींन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले,हे काम मनपाचे अधिकृत कंत्राटदार एकनाथ निकम यांच्या मार्फत करण्यात आले असून यामुळे पाईप लाईन च्या कामा मुळे नागरीकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे,नागरिकांनी मनपा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला