औरंगाबाद शहरातील नामवंत  शाळेत कार्यकरत असलेल्या 55 वर्षीय शिक्षिकेला त्यांच्याच माझी विद्यार्थ्याने आपण कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे म्हणत तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात  शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे असे या माजी विद्यार्थ्याचे नाव आहे.शिक्षिकेने त्याला ॲपलचा मोबाइल व लॅपटॉपविषयी विचारणा करून ऑर्डर दिली. त्यासाठी पृथ्वीराजने 40 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही, असे म्हणून 50 हजार मागितले. डिस्काउंट जरा कमी झाला म्हणून 11 हजार अजून पाठवा, अशी विविध कारणे सांगून त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षिकेला संशय आला. काही दिवसांनी पृथ्वीराज मोबाइल बंद करून फरार झाला. यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे शिक्षिकेच्या लक्षात आले. यानंतर शिक्षिकेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्दा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं