औरंगाबाद जिल्हयातील एकूण 5 लक्ष 34 हजार 394 पशुधन असून त्यापैकी आजपर्यंत 5 लक्ष 18 हजार 923 गुरांचे 97 % लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे . जिल्हयात आतापर्यंत औषधोपचारातून 1404 गुरे बरी झाली आहेत . तर 451 गुरांवर उपचार सुरु आहे . जिल्हयातील ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून तसेच पशुसंवर्धन विभागाने देखील गुरांचे लसीकरण केले आहे . औंरगाबादमधील जिल्हयात सर्व तालुक्यात लसीकरण करण्यात आले आहे . जिल्हयात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्याचे निर्देश दिल्याने जिल्हयात मोठया प्रमाणात गुरांचे लसीकरण करण्यात आले . त्यांनी लसीकरण करून घ्यावे लसीकरण मुळे या रोगाचा जिल्हयात संसंर्ग रोखण्यास मोठया प्रमाणात मदत झाली . ज्या पशुपालकांची गुरे लम्पीने बाधीत आहेत , त्या बाधित जनावरांना उपचारासाठी येणा-या पशुवैदयकीय अधिकारी व कर्मचा-यांना पशुपालकांनी सहकार्य करावे व आपली गुरे लसीकरण व औषधोपचारातुन लम्पी रोगमुक्त करावी.