बीड (प्रतिनिधी) बीड येथील भाजप चे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी यांनी आज दिनांक ११ वार मंगलवार सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडून घेताच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचं उपचारादरम्यान मृत्यू झाला भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीं भगीरथ बियाणी यांच्या मृत्यु ने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे महिती मिळताच जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय धाव घेतली.