एसटी महामंडळ प्रशासनाने चालक वाहकांचे पगार अगोदर करून एक आदर्श निर्माण केला आहे . तर राज्यातील पंधरा हजारांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आहे . यात औरंगाबादेतील पावणेदोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . वेतन वेळेत न मिळाल्याने ते नाराजी व्यक्त करत आहे . ऐरवी एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिले वेतन देऊन चालक व वाहकांचे वेतन थकत असे . यावरून प्रचंड गदारोळ होत होता . आंदोलन पुकारले जात असे . यंदा मात्र , महामंडळ प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून चालक व वाहकांना अगोदर पगार दिला आहे . यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे . चालक व वाहक आनंद व्यक्त करत असून बसही सुसाट धाऊ लागल्या आहेत . काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याचे स्वागतही केले आहे . मात्र , त्यांचे वेतन थकले व ते वेळेत होत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे . दिवाळी पंधरा दिवसांवर येऊ ठेपली आहे . बँक हप्ते , घर भाडे , कुटुंबाचा उदनिर्वाह , आदी खर्च कसा पूर्ण करावा , असा यक्ष प्रश्न त्यांना पडलेला आहे विविध कंपन्यांकडून कामगारांना बोनस वाटप करण्यात येत आहे . सानुग्रह अनुदान दिले जात आहे . मात्र , एसटीचे कामगार व कर्मचारी , अधिकाऱ्यांबाबात महामंडळ प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही . अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही त्यामुळे यंदाची दिवाळी कशी जाणार याबाबत ते चिंतातूर झाले आहेत . वेतन , बोनस , सानुग्रहाची सर्वांना प्रतिक्षा लागली आहए