रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे सुपलवाडी येथे एका 35 वर्षीय विवाहितेने आजाराला कंटाळून पेट्रोलने पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साक्षी संजय कुवेस्कर (35, राजयोग वाटीका नाचणे, सुपलवाडी), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी या गेले 8 ते 10 वर्षापासून अस्थमाने आजारी होत्या. या आजारपणाला कंटाळून त्यांनी घरात रिक्षासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेत जाळून घेतले. त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.