चिपळूण : केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवा, असा सल्ला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देतांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी चिपळुनातील हॉटेल अभिरुचीमध्ये आयोजित भाजपच्या चिपळूण-गुहागर तालुक्यातील संघटनात्मक आढावा घेताना केले.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यावेळी भाजपा चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू यांच्यासह गुहागर मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले. नंतर या सर्वांची शासन स्तरावरील विविध निवेदने ना. चव्हाण यांनी स्वीकारली. यावेळी ना. रवींद्र चव्हाण यांनी पार्लमेंट ते पंचायत भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांकडून काय अपेक्षित आहे. या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार ने शंभर दिवसात घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांचे विवेचन केले. यावर्षी दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत शंभर रुपयांमध्ये अत्यल्प किमतीत दिवाळी जिन्नस किट देण्यात येणार आहे. त्यामध्ये तेल, रवा ,साखर चणाडाळ (प्रत्येकी १किलो) आदींचा समावेश आहे. या योजनेची माहिती ना. चव्हाण यांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे ,माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण शहर अध्यक्ष आशिष खातू , खेड तालुका अध्यक्ष किशोर आंब्रे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप आदींची उपस्थिती होती.

तर माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, विनोद भोबसकर, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, सौ. नुपूर बाचीम, विनोद सुर्वे, सचिन शिंदे, श्रीराम पवार, भाजपा युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रथमेश भोबस्कर, श्रीराम शिंदे, मंदार कदम आदी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन रामदास राणे यांनी केले.