बीड पतीनिधी-सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य हा आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. वयाची 18 ते 25 वर्ष शिक्षणामध्ये जातात शालेय जीवन झाल्यानंतर कॉलेजचे जीवन चालू होतं शाळा आणि कॉलेजच्या जीवनामध्ये अभ्यास एक अभ्यास, गृहपाठ,परीक्षा क्लास, ट्युशन, दप्तराचे ओझे या सगळ्या गोष्टीमुळे शालेय जीवनामध्ये आणि कॉलेजच्या जीवनामध्ये अतिशय ताण-तणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी माणूस घरापासून दूर राहतो त्यामुळे प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं जात नाही सकस संतुलीत आहार निरोगी जीवन यापासून दुर्लक्षित होतो त्यानंतर नोकरी आणि जॉबच्या संदर्भामध्ये आहाराकडे दुर्लक्ष,खानपानाकडे दुर्लक्ष सकस संतुलित आहार घेतला जात नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी शरीराला पाहिजे असणाऱ्या मिळत नाहीत त्यामुळे सध्याच्या जगामध्ये डायबिटीस(मधुमेह), बीपी(रक्तदाब), कॅन्सर(कर्करोग), क्षयरोग, दमा, ॲलर्जी, त्वचारोग,मानसिक नैराश्य आणि इतर दुर्धर आजार वाढलेले आहेत परंतु याला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक ठोस उपाय म्हणून रोग होऊ नये म्हणून सकस संतुलित आहार घेतला पाहिजे आणि तो आहार एक वेलनेस इंडस्ट्रीच देऊ शकते असा ठाम विश्वास हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला.
काल औरंगाबाद येथे झालेल्या वेलनेस इंडस्ट्रीच्या हरबल लाईफ कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी असलेले हिमा डॉक्टर संघटना बीड जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांनी सांगितले की आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी सकस संतुलित आहार घेतला पाहिजे.धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला नश्वर सुख प्राप्त करण्यामध्ये जास्त रस वाटत आहे परंतु भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे मरण हे जीवनाचे अटळ सत्य असून आरोग्यदायी जीवन जगणं,शरीर रोगमुक्त असणे हीच खरी संपदा असून इतर संपत्ती पेक्षा शरीर संपत्ती महत्त्वाची आहे आणि ती वाढवायची असल्यास सकस संतुलित आहार,सतत व्यायाम आणि मानसिक स्थैर्य प्राणायाम, योगा, व्यायाम , मेडिटेशनच्या माध्यमातून प्राप्त केलं पाहिजे. त्यामुळे योगासने प्राणायाम व्यायाम त्याचबरोबर सकस संतुलित आहार घेतलाच पाहिजे आत्ताच्या जगामध्ये हे सगळं एकाच ठिकाणी प्रोवाइड केलं जातं ते म्हणजे हर्बल लाईफ होय त्यांचे आयुर्वेदिक प्रोडक्ट अतिशय उच्च प्रतीचे असून त्याचा रिझल्टही उत्तम आहे.मी स्वतः पाहिलेला आहे.दुर्धर आजार जे की बऱ्याच उपचारांनंतर बरे झाले नाहीत असे आजारही सकस संतुलित आहार,हेल्दी लाइफस्टाइल, सकारात्मक जीवनशैली, व्यायाम, योगासने, प्राणायाम इत्यादींमुळे बरेचशे दुर्धर आजार बरे झाल्याचे पेशंटच्या माध्यमातून समजते आहे.त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शरीर संपत्ती सुधरवायची असल्यास सकस संतुलित आहार दररोज व्यायाम योगासने प्राणायाम आहे आणि मेडिटेशन खूप महत्त्वाचे आहे आणि ते सर्व हरबल लाईफ अतिशय माफक दरामध्ये पुरवत आहे. त्यामुळे हजारो लाखो रुग्णांना त्याचा फायदा होत असून त्यामुळे वजन घटवणे, वजन वाढवणे,कॅन्सर वरती मात, एचआयव्ही सारख्या दूरधर आजारावरती मात, टीबी दमा, मधुमेह,रक्तदाब,त्वचारोग इत्यादीं आजारांवर अतिशय प्रभावीपणे मात केली जाऊ शकते असा विश्वास डॉक्टर जितिनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला. यासाठी सखोल मार्गदर्शन आणि मोफत सल्ला हवा असल्यास संपर्क संजीवनी हॉस्पिटल खालापूरी,संपर्क डॉ जितीन वंजारे -९९२२५४१०३०.