खेड: तालुक्यातील तळे काळकाईवाडी येथे घराच्या समोरील पडवीत लावलेल्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद प्रतिभा मोरे (५५, घाटकोपर, मुंबई) यांनी पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा मोरे या कामानिमित्त ४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत मुंबई येथे गेल्या होत्या. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरटयाने घरासमोरील पडवीत लावलेली पल्सर चोरून नेली. मोरे या घरी आल्यानंतर त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी याबाबत आजूबाजूला चौकशी मात्र काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.