शेवटच्या टोका पर्यंतच्या (टेलपर्यंत) शेतीला पाणी मिळेल अशी सोय करा

 आमदार डॉक्टर देवरावजी होळी

रेगडी जलाशय येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते जलपूजन

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते शेतीला पाणीपुरवठा सुरू

गडचिरोली(महाराष्ट्र):- शेतीला   शेवटच्या टोकापर्यंत (टेलपर्यंत) सर्वांनाच पाणी मिळावे अशी व्यवस्था जल व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी रेगडी जलाशय येथील जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या शुभहस्ते शेतीकरिता पाणी सोडण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा ,महामंत्री सुशांतजी राय, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, ज्येष्ठ भाजप नेते जयरामजी चलाख ,भोजराज भगत, जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री मेश्रामजी ,कनिष्ठ अभियंता विकासजी दुधबावरे, वन विभागाचे अधिकारी , कर्मचारी यांचे सह शेतकरी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते

रेगडी जलाशयाच्या माध्यमातून या परिसरातील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनाने व्याप्त असल्यामुळे या ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प फार कमी आहेत. अशा स्थितीमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची वाताहत होत असते त्याकरिता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची योग्य नियोजन करून या जलाशयाच्या पाण्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे समाधान कसे करता येईल याबाबत नियोजन करावे व पाण्याचे वितरण करताना शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कसे दिले जाईल याची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.