औरंगाबाद : हर्सुल येथील म्हसोबानगरात राहणारे संतोष रमेश मोरे यांचे घर फोडून चोरांनी २७ ग्रॅम सोने चोरून नेले . ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान ही घटना घडली असे संतोष मोरे यांनी सांगितले . मोरे हे दसऱ्यानिमित्त घराला कुलूप लावून गावाला गेले होते . साई रुद्रायणी अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे . चोरांनी घराचे कुलूप तोडून कपाटाचे लॉकर तोडत त्यातील १८ ग्रॅमचे गंठण , ९ ग्रॅमचे कानातले चोरून नेले . याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .