बीड (प्रतिनिधी) शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस ग्रुप, ए.सी.सी.ग्रुप, युनिक अकॅडमी कडून सत्कार करण्यात आला.सा.द स्कूल एक्सप्रेस वृत्तपत्रामार्फत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावेळीही दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे घेण्यात आलेल्या पुरस्कार समारंभामध्ये अनेकांना सन्मानित करण्यात आले.
यात मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ हे गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, आदी विषयांवर आपल्या परखड व सडेतोड लिखाणाने वाचा फोडून उचललेल्या मुद्द्यावर शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून संबंधित मुद्दे तडीस घेऊन जाण्याचे कार्य करीत असल्याने त्यांच्या निष्पक्ष, परखड व सडेतोड पत्रकारितेची दखल घेऊन द स्कूल एक्सप्रेस ग्रुप, ए.सी.सी. ग्रुप व युनिक अकॅडमी कडून आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभामध्ये संपादक शेख एजाज़ आणि संचालक प्रा. सुनील खंडागळे सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्राचार्य पैठणे सर, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उद्योगपती संतोष सोहनी, प्रभारी उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, संस्था सचिव अशोक लोढा, गटशिक्षणाधिकारी टेकाळे, संस्था सचिव गोविंद वाघ, शिक्षक नेते उत्तमराव पवार, गुरुकुल संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे, सिताई कन्स्ट्रक्शन चे रणजीत क्षीरसागर, प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव सत्यभामा ताई बांगर आणि सौ. नीता घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.