रत्नागिरी : अहमदाबाद (गुजरात) येथे ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा थरार सुरु आहे. या सपर्धेत यंदा प्रथमच योगासन या क्रीडा प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयातील योग प्रशिक्षण केंद्राच्या योगपटू आंतरराष्ट्रीय खेळाडू पूर्वा किनरे आणि प्राप्ती किनरे यांची निवड झाली आहे. किनरे भगिनी या स्पर्धेत सहभागी होणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गेली दहा वर्षे त्या जिल्हा क्रीडा कार्यालयाचे योग प्रशिक्षक रवि भूषण कुमठेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. पूर्वा आणि प्राप्ती या योगाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी आजवर विविध राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पूर्वाने ६ वेळा तर प्राप्तीने ५ वेळा सुवर्ण आणि रौप्यपदके पटकावली आहेत. पूर्वा हीने फान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदके मिळवली आहेत. भारत योगसम्राज्ञी, मिस योगिनी हे पूरस्कारही तिने प्राप्त केले आहेत. या दोघींना जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, नितीन तारळकर, चंद्रदीप शिंदे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, राजेश आयरे, किरण जोशी, श्रध्दा जोशी यांच्यासह वडील शिवराम किनरे आणि त्यांची आई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.