बोके , चोर , रिक्षावाला असा उल्लेख करून आज आनंद दिघे जिवंत असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लटकवून मारले असते , असे वक्तव्य करणे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना महागात पडले . शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दुपारी दीड वाजता तक्रार देऊन तासभर पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला . त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता सातारा पोलिस ठाण्यात खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . मुख्यमंत्री शिंदेंची बंडखोरी , शिवसेनेचे चिन्ह गोठवल्या प्रकरणावर खैरे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली . तेव्हा त्यांनी शिंदे यांच्यावर जहाल टीका केली . ती ऐकताच जंजाळ ५० ते ६० कार्यकर्त्यांसह दुपारी दीड वाजता पोलिस आयुक्तालयात पोहोचले . सहायक पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के , गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव , गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव , विशेष शाखेचे निरीक्षक प्रमोद कठाने आयुक्तालयात दाखल झाले . जंजाळ यांनी खैरेंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे , अशी मागणी केली . अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ . निखिल गुप्ता यांच्याशी चर्चा केली . नंतर पोलिसांनी त्यांना आधी निवेदन द्या , सातारा पोलिस ठाण्यात जा असा सल्लातेथे निरीक्षक सुरेंद्र माळाळे , आघाव यांनी पुन्हा दालनात तासभर कलमांवर चर्चा केली . त्यानंतर ६.३७ वाजता गुन्हा दाखल झाला . काय म्हटले एफआयआरमध्ये ? : खैरेंनी मुख्यमंत्र्यांचे चारित्र्यहनन व प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला . तसेच त्यांची सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावर असंविधानिक भाषेचा वापर केल्याने आमच्या भावना दुखावल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे . आता पोलिस खैरेंच्या विधानांची तपासणी करतील , पुरावे गोळा करतील व पुढील कारवाई ठरवण्यात येईल , असे पोलिसांनी सांगितले . खैरेंवर १४ राजकीय , आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत . पाकिस्तान , खलिस्तानवाद्यांना जमले नाही ते पाप शिंदेंनी केले माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर होऊ द्या , मी घाबरत नाही . एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी करत संघटना फोडली . गेल्या पन्नास वर्षांत खलिस्तानवादी , पाकिस्तानवाद्यांना कधीही हे जमले नव्हते . या गद्दारांनी भाजपकडून खोके घेऊन संघटना फोडण्याचे पाप केले . त्याबद्दल त्यांना कोणीही माफ करू शकत नाही