पिंपरी - चिंचवड : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज पिंपरी चिंचवडला भेट देऊन अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला..पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन अधिवेशनाची तयारी सुरू असल्याबद्दल देशमुख यांनी समाधान व्यक्त केले..

यावेळी बोलताना अरूण नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी मराठी पत्रकार परिषदेने विश्वास दाखवत अधिवेशनाची जबाबदारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघावर सोपविल्याबददल एस.एम देशमुख यांचे आभार मानले..

परिषदेचं हे अधिवेशन परिषदेच्या नियमानुसार आणि धयेयधोरणानुसार तसेच परिषदेच्या प्रतिष्ठेला साजेशा पध्दतीने साजरे केले जाईल असा विश्वास नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी व्यक्त केला..

अधिवेशन सर्वसमावेशक व्हावे यासाठी संघाच्या सर्व सदस्यांची मतं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी दर शनिवारी सर्व सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली.. आर्थिक व्यवहार पारदर्शक राहावेत यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असून त्या संबंधीचे अहवाल नियमितपणे परिषदेला दिले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.. अधिवेशनानंतर शिल्लक राहिलेला निधी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ, आणि मराठी पत्रकार परिषदेला समान हिस्सात दिला जाईल असेही नाना कांबळे यांनी स्पष्ट केले..

पिंपरी - चिंचवड पत्रकार संघाच्या या भूमिकेचं स्वागत करीत एस.एम देशमुख यांनी राज्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं.. पिंपरी चिंचवडचं अधिवेशन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरेल असा विश्वास देखील एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला..

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे संघटक सुनील वाळुंज, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण शिर्के, अविनाश आदक, राजू वारभूवन, आदि उपस्थित होते..