संभाजीनगर: शिवसेनेच्या चिन्ह बाबत झालेल्या निर्णयानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी पक्षाची स्थापना केली . उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देशभरात मोठे झाले आहे त्यामुळे त्यांना समोर येऊन पराभव करणे शक्य नाही त्यामुळे भाजपच्या वतीने हा डाव सुरू आहे मात्र खोके बहाद्दर आणि गद्दारांना शिवसेना धडा शिकवेल अशी टीका त्यांनी केली अंधेरीत शिवसेना जिंकणारच दानवे म्हणाले की सध्याचा हा निर्णय फक्त अंधेरी विधानसभा निवडणुकीपुरता आहे या निवडणुकीत शिवसेना विजयी होणार असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे तसेच केंद्रातल्या दबावापोटीच हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं गल्लीतल्या लहान पोरं देखील आता हे कळतं असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली आहे शिवसेनेमध्ये केवळ आमदार म्हणजे शिवसेना नव्हे तर शाखाप्रमुख उपनेते नेते अशी शिवसेनेची रचना आहे . जनता ही शिवसेनेसोबत आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले