मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे आमचेही मत आहे. मात्र, ओबीसी समाजातून आरक्षण मागायला लाऊन दोन समाजात भांडणे लावली जात आहेत. आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्र सरकारच्या अखत्यारितला हा मुद्दा आहे. केवळ समाजाला खुश करण्यासाठी मराठा समाजाला मागच्या वेळी आरक्षण दिले. आता हीच लोक मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देश विकून देश चालवला जात आहे महाराष्ट्र सरकार हे गुजरात साठी काम करत आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
बीड येथे शनिवारी (ता. आठ) काँग्रेसचा विभागीय ओबीसी मेळावा श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मेळाव्यात व नंतर पत्रकार परिषदेत श्री. पटोले यांनी वरिल मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार कल्याण काळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की लोकशाहीचे चारही स्तंभ केंद्र सरकार हाती घेऊ पाहत आहे.
शिवसेना चिन्हाबाबत न्याय व्यवस्थेला काम करु द्यावे, आता अत्याचारी सरकार विरोधात बंडाची लढाई सुरु झाली आहे. लढाईत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राहूल गांधींची पदयात्रा कॉं्रगेससाठी नाही तर देशासाठी, संविधान वाचविण्यासाठी आहे. या लढ्यात राहूल गांधींना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपकडून खालच्या पातळीवर टिका केली जात आहे. संत भगवानबाबांनी सर्व जाती - धर्मांसाठी काम केले. आता त्यांना समाजापुरते मर्यादीत केले जातेय. संत भगवान बाबांची शिकवण व काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. बाबांनी गडावर आणून शिकवलेले अनेकण आता देशात उच्चपदावर आहेत. आता देश विकून देश चालविला जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यामुळे रुपया दिवसेंदिवस घसरत आहे. आपल्या देशातील सर्व काही विकून झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला न्याय देता येत नसल्याने मंत्रीपद सोडले. तसेच आपणही खासदारकी सोडली. मी जर यांच्या पुढे पुढे केल असते तर केंद्रात मंत्री राहीलो असतो. देशातील महागाइई कृत्रीम असल्याचे सांगत नाना पटोले यांनी बीडमध्ये केंद्र सरकारवर सडकडून टीका केली. काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय ओबीसी मेळाव्याला बीडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाना पटोले यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी संत भगवान गडावर जाऊन बाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर बीडमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थित मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीला काँग्रेस कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
काय म्हणाले नाना पटोले
- ईडी सरकार गुजरात धार्जीने
- शिवसेना चिन्हाबाबत न्याय व्यवस्थेला काम करु द्य
- अत्याचारी सरकार विरोधात बंडाची लढाई सुरु झाली
- राहूल गांधींची पदयात्रा काँग्रेसससाठी नाही तर देशासाठी, संविधान वाचविण्यासाठी
- राहूल गांधींच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टिका
- संत भगवानबाबांनी सर्व जाती - धर्मांसाठी काम केले. आता त्यांना समाजापुरते मर्यादीत केले जातेय संत भगवान बाबाचे विचार कार्य पुढे नेण्याचे काम करणार आहे