मानवत:-तालुक्यातील रामपुरी बु. येथे नुकताच डाक मेळावा संपन्न झाला .डाक सहाय्यक अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये स्थानिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली .

    भारतीय डाक विभागाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या जाव्यात यासाठी सध्या डाक विभागाकडून पोस्टल मिळवण्याचे आयोजन केले जात आहे .मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथे नुकताच डाक मेळावा संपन्न झाला यावेळी डाक सहाय्यक अधीक्षक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती .त्यांनी उपस्थितांना ग्रामीण टपाल जीवन विमा ,सुकन्या समृद्धी योजना ,एक्सीडेंटल पॉलिसी याच्यासह डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी पोस्टा अंतर्गत येणाऱ्या 50 व्यक्तींनी खाते काढले .

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोस्टमास्तर त्रिमले ,वाघाळा येथील बीपीएम सि.टी घुंबरे यांनी परिश्रम घेतले .