भुई आळी नवीन कॅनॉलच्या बाजुला फुरसुंगी येथे पत्र्याच्या पडवीत मोकळया जागेत स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगार घेताना खेळताना १९ आरोपींना ताब्यात घेवून त्यांचकडुन कल्याण मटका जुगार साहित्यासह ९ मोबाईल व ४ दुचाकी वाहने असा सुमारे 3 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उप-आयुक्त नम्रता पाटील, सहा. पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे, तृप्ती खळदे, पोलीस अंमलदार वसिम सय्यद, गिरीधर एकोगे, बाबासाहेब शिंदे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूद्ध सोनवणे, अतुल पंचरकर यांचे पथकाने सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.