रत्नागिरी : रत्नदुर्ग माउंटेनिअर्स ही संस्था गेले अनेक वर्ष साहस व समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आली आहे .या संस्थेचे कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे उघडण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत उपस्थित होते. यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यांच्यासमवेत र न प मुख्याधिकारी श्री बाबर साहेब, माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित, माजी नगरसेवक राजन शेटे, माजी नगरसेवक दत्तात्रय साळवी, माजी नगरसेवक निमेशजी नायर, शहर प्रमुख बिपिनजी बंदकर माननीय आर्किटेक संतोष तावडे चेअरमन पर्यटन समिती ,मा. पेडणेकर साहेब उपस्थित होते.

        

या उद्घाटन प्रसंगी टीम रत्नदुर्ग माउंटेनअर्स तर्फे नामदार मंत्री उदयजी सामंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्स चे अध्यक्ष श्री वीरेंद्र वणजू यांनी आपल्या मनोगतात कार्यालयासाठी व साहसी प्रशिक्षण साहित्या साठी नामदार उद्योग मंत्री नामदार उदय जी सामंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.

 तसेच नामदार मंत्री उदयजी सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये रत्नदुर्गचे भरभरून कौतुक करत चिपळूण मधील बचाव कार्यातील टीम रत्नदुर्गने त्यांच्या डोळ्यासमोर केलेल्या साहसी बचाव कार्याचा आवर्जून उल्लेख केला व आजवर केलेल्या सर्वच समाज उपयोगी कामांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाकरिता टीम रत्नदुर्गचे १९९४ पासूनचे सर्व टीममेंबर हजर होते.

तसेच या कार्यक्रमाकरिता रत्नागिरी क्रीडाई अध्यक्ष नित्यानंद भुते, दीपक साळवी, महेश गुंदेजा, रत्नागिरी खबरदार चे संपादक श्री हेमंत वणजू, व अनेक शुभचिंतक उपस्थित होते.

राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे टीम रत्नदुर्ग मौंटेनिअर्सचे 27 वर्षापासून चे स्वप्न आज पूर्ण होत आहे त्याबद्दल सर्व रत्नदुर्ग मेंबर्सनी राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांचे भरभरून कौतुक केले व आपला आनंद व्यक्त केला.