औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच निवडीत भाजपने सदस्यांची फोडाफाडी करीत बाजी मारत शिंदे गटाला धक्का दिला. सरपंचपदी दिलीप बाबुराव शेजुळ, तर उपसरपंचपदी भावना विनोद शेजुळ विराजमान झाले. ९ पैकी सरपंच, उपसरपंच यांना प्रत्येकी ६- ६ तर विरोधी उमेदवारांना ३- ३ मते मिळाली. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यात भाजपकडून सरपंचपदासाठी दिलीप शेजुळ, उपसरपंचपदासाठी भावना शेजुळ याांनी तर विरोधी शिंदे गटाकडून सरपंचपदासाठी माधुरी समाधान गायकवाड यांनी तर उपसरपंच पदासाठी वंदना कल्याण शेजुळ यांनी अर्ज दाखल केले होते. यात भाजपचे उमेदवार ६- ३ अशा फरकाने विजयी झाले. बैठकीला सदस्य प्रदीप शेजुळ, मनीषा सुनील पांढरे, पार्वताबाई किसन दुधे, भगवान नाईक, भगवान आहिरे उपस्थित होते. या निवडीत स्वतःला मंत्री अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख सांगणारा एक सदस्य गळाला लागला व फोडाफोडीत भाजपला यश आले, तर पारडे जड असल्याचे लक्षात येताच पुन्हा एका महिला सदस्याने आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले.अध्याशी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी भाग्यवंत यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी वाल्मीक म्हस्के, ग्रामसेवक दयानंद गुंजकर यांनी मदत केली. निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी साहेबराव शेजुळ, किरण शेजुळ, रामदास दुधे, राधाकिसन ढवळे, साहेबराव आहिरे, सोमिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
નાગલધામ ખાતે હરસુખભાઈ ડોબરીયા તેમજ મહિયા ક્ષત્રિય સમાજ દ્વારા રીંગણીના રોપનું વાવેતર કરવામાં આવ્યું
નાગલધામ ખાતે હરસુખભાઈ ડોબરીયા તેમજ મહિયા ક્ષત્રિય સમાજ દ્વારા રીંગણીના રોપનું વાવેતર કરવામાં આવ્યું
કેનાલ ફેલાવશે રોગચાળો Canal will spread epidemic
કેનાલ ફેલાવશે રોગચાળો Canal will spread epidemic
Raj Thackeray at Pune : राज ठाकरेंचे ढोल ताशाच्या गजरात पुण्यात स्वागत : ABP Majha
Raj Thackeray at Pune : राज ठाकरेंचे ढोल ताशाच्या गजरात पुण्यात स्वागत : ABP Majha
इंसान के अंदर दृढ़ संकल्प शक्ति होती है
जिस व्यक्ति के अंदर दृढ़ संकल्प शक्ति होती है वह अपने अंदर ऊंचा उठने की शक्ति को महसूस करता...
SRIKONA BATTALION OF ASSAM RIFLES CONDUCTED CIVIL SOCIETY
SRIKONA BATTALION OF ASSAM RIFLES CONDUCTED CIVIL SOCIETY ORGANISATION MEET
Srikona...