खेर्डा तांडा येथे तिज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. 

 पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातिल खेर्डा तांडा येथील सेवालाल महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे तिज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून नवरात्राचे नव दिवस तिज पूजन करून नवव्या दिवशी तिज विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. तिज विसर्जनासाठी पंचक्रोशीतील नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. रोज वेगवेगळ्या भक्तांकडून प्रसाद वाटल्या केला आहे.यावेळी नानू जाधव, संजय जाधव, गणेश जाधव, भाऊसाहेब जाधव, रमेश जाधव ,अंकुश जाधव, खुशाल जाधव, दिनेश जाधव, शांतीलाल जाधव ,राजू जाधव, बद्री जाधव, अमोल भाऊ राठोड युवा मंच सह आदी जण उपस्थित होते.