तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरेस ही अनेक तलाव धरणे कोरडीठाक होती.मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजा ला अखेर दिलासा मिळाला आहे.काल दि.6 ऑक्टोंबर रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली तब्बल 4 ते 5 तास धो धो पावसाने झोडपले असून नदी नाल्या तलाव ओव्हर फ्लो झाले असून काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.तर कांदा पिकाचे हि नुकसान झाले आहे.नुकसान भरपाईची
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मागणी शेतकरी वर्गातून होत असून तोंडात भरवायला आलेला घास हिरवल्याने तात्काळ नुकसान भरपाई ची मागणी होत आहे.आज सकाळपासूनच पाऊस सुरू असून शेतकर्यांना पाऊस न उघडल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने चिंतातुर झाले आहेत.
तालुक्यातील आष्टा,कडा,आष्टी या महसूल मंडळात दि.6 ऑक्टोंबर रोजी रात्री 12 च्या नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली पहाटे पर्यंत जोरदार पाऊस झाला तर आज सकाळपासून पाऊस सुरू असून नदी नाल्या तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीनचे पिक पाण्यात भिजत असून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.रात्री अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकर्यांची दाणादाण उडाली आहे. शेतकर्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतक-यांचे सोयाबीन काढणीस आले असून अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला आहे.आष्टी परिसरातील व शेजारील चिखली,मुगगांव, क-हेवाडी,क-हेवडगांव,पोखरी,मातकुळी व इतर गावांत सोयाबीन काढणीअभावी शेतात भिजत आहे. यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावरून घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.