शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्य हद्दीत सम्राट चौकात ऑनलाईन चक्री जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींच्या पथकाला मिळताच त्याठिकाणी काल सायंकाळी धाड टाकण्यात आली. या वेळी 9 जुगार्‍यांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम 19 हजार 420 आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 1 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बीड शहरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन चक्री जुगार सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष आहे. शहरातील सम्राट चौक शाहूनगर येथे ऑनलाईन जुगार चक्री हारजीतचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांचे पथकप्रमुख विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांनी काल सायंकाळी त्याठिकाणी छापा टाकला. या वेळी फारुक नसीर शेख, शेख जमीर शेख सादीक, अनिकेत जीवन पुरी, अमोल संजय बारसकर, अमर वसंत भानुसे, खलील बशीर बागवान, ऋतिक पंडित रकटे, शनी एकनाथ रंजे आणि अनिल सुदाम मुळे यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले तर चक्री मालक आसेफ शेख (रा. मसरतनगर, बीड) तसेच चक्री आयडी पुरवणार्‍या अशा 11 आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकप्रमुक सपोनि. विलास हजारे, पो.ना. शिवदास घोलप, विकास काकडे, पोलीस अमलदार बालाजी बाश्टेवाड, किशोर गोरे, विनायक तरुण, गणपत पवार यांनी केली.