राज्यभरात जिल्हा रुग्णालय अंतर्गत समुपदेशकांची भरती करावयाची आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात 12 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी राज्यभरातून 1200 अर्ज आलेले आहेत. या अर्जदारांच्या मुलाखती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे घेत आहेत.

राज्यात बेरोजगारीचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. शासकीय कार्यालयात जागा निघाल्यानंतर शेकडोने नव्हे तर हजारोने अर्ज दाखल होत असतात. राजत जिल्हा रुग्णालयअंतर्गत समुपदेशकांची भरती करावयाची आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात 12 जागेसाठी जवळपास 1200 अर्ज आले होते. या अर्जदारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. सदरील मुलाखती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे घेत आहेत.