परळी दि.06 (प्रतिनिधी) - परळी मतदारसंघ माझा आत्मा आहे, राज्याच्या राजकारणात सत्तेत असताना कोविडच्या काळातही मतदारसंघाचा निधी कधी थांबला नाही, आज सत्ता परिवर्तन झाले असले, तरीही आपण आपल्या ताकतीवर विकासकामांना निधी खेचून आणू, सत्तेत असलो किंवा नसलो तरीही मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत दिलेला कोणताही शब्द फिरवणार नाही, असे अभिवचन आज धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातल्या लाडझरी येथे बोलताना दिले. लाडझरी येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुमारे 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला. तसेच यावेळी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणाच्या बैठकीस अक्षरशः जाहीर सभेचे स्वरूप आले होते. यावेळी धो-धो पावसाच्या सरी बरसत असताना धनंजय मुंडे यांनी सभा गाजवली. लाडझरीसह या परिसरातील जनतेने माझ्यावर प्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्या या ऋणातून मी कधीही रिता होणार नाही, लाडझरीच्या मागणीनुसार 132 केव्ही उपकेंद्र मंजूर आहे, येत्या काही दिवसातच या उपकेंद्राचे काम सुरू होईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून झालेल्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ यावेळी संपन्न झाला. यामध्ये जलजीवन मिशन मधून मंजूर 1 कोटी 20 लाखांची पाणी पुरवठा योजना, 84 लाखांची विविध विकासकामे, गोसावी समाजाच्या स्मशान भूमी साठी 20 लाख, मुस्लिम स्मशानभूमी कंपाउंड साठी 15 लाख, वाणी समाजच्या स्मशानभूमीसाठी 15 लाख, सार्वजनिक स्मशानभूमीसाठी 15 लाख, गाव अंतर्गत रस्त्यांच्या विविध कामांसाठी 50 लाख, पानंद रस्ते, बुध विहार आदी कामांचा समावेश आहे. याप्रसंगी मा.आ. संजय भाऊ दौंड, ऍड. गोविंदराव फड, माऊली तात्या गडदे, बाळासाहेब देशमुख, सूर्यभान नाना मुंडे, पिंटू मुंडे, शिरीष नाकाडे, अशोक गुट्टे, राजाभाऊ कांदे, इंद्रजीत होळंबे, एकनाथ कांदे, सुनील घुले, ज्ञानोबा मुंडे, वैजनाथ मोठे, व्यंकट मुंडे, राजाराम मुंडे, गंगाधर मुंडे, सुदर्शन पुरी, बापूराव नाकाडे, बाबुराव तिडके, नागराज बडे, रतनहरी मुंडे, रामदत्त महाराज पुरी यांसह आदी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ભારતમાં ઘૂસણખોરી કરતો પાકિસ્તાની શખ્સ ઝડપાયો..
BSF જવાનોએ પાકિસ્તાની યુવકને બોડર ઉપર થી ઝડપી પાડ્યો..
નડેશ્વરી BOP પાસેથી ગેટ પરથી નીચે ઉતરતા પાકિસ્તાની યુવકને ઝડપી પાડ્યો..
બનાસકાંઠા ના સરહદી વિસ્તાર ના નડેશ્વરી Bop પાસે થી..
ભારતમાં ઘૂસણખોરી કરતો પાકિસ્તાની...
દેશમાં કોરોનના કેસમાં ચીંતા જનક વધારો.! 1 દિવસમાં 6000 થી વધુ કેસ નોધાયા જ્યારે 14 લોકોના મોત થયા॰!
દેશમાં કોરોનના કેસમાં ચીંતા જનક વધારો.! 1 દિવસમાં 6000 થી વધુ કેસ નોધાયા જ્યારે 14 લોકોના મોત થયા॰!
Vadodara l શિનોર ખાતે વૈષ્ણવપરિવાર દ્વારા વનકુટ મહોત્સવની ઉજવણી l Divyang News
Vadodara l શિનોર ખાતે વૈષ્ણવપરિવાર દ્વારા વનકુટ મહોત્સવની ઉજવણી l Divyang News