*📰जनता न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी माबुद खान✍🏻*
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार गुरुवार दिं.06 ऑक्टोबर रोजी नवनिर्वाचित सरपंच मोबिन कुरेशी यांनी स्विकारला आहे.
रविवार 18 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी व ग्रामपंचायत सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवार दिं.19 सप्टेंबर रोजी पार पडली या मध्ये थेट सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतूर पंचायत समितीचे माजी उप सभापती मोबीन कुरेशी यांनी काँग्रेस पक्ष व सुरेश भैय्या नागरे पुरस्कृत पॅनलच्या वतीने सरपंच पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केला व उपसरपंच पदि काँग्रेस पक्षाच्याच वतीने सौ.देशमुख ताई यांची वर्णी लावण्यात यश संपादन झाले आहे.
प्रशासनाच्या नियमानुसार गुरुवार दिं.06 ऑक्टोबर रोजी मोबीन कुरेशी यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारला या वेळी काँग्रेस पक्षाचे संघटन युवा नेते मुजाहेद कादरी,युवा सामाजिक कार्यकर्ते रविकांत देशमुख,नवनिर्वाचित
ग्रा.प सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त अनवर पटेल,ग्रा.प सदस्य अब्दुल सलाम नाईक,शेख ईमरान,शाखा अध्यक्ष प्रभाकर ईखे,जेष्ठ सामाजिक कार्यक्रर्ते बाबुरावजी सोनवने,सदाशिवराव घुगे,गुलाबराव ईखे,जकाते महाराज,आनंदराव हराळे,युवा कार्यक्रर्ते अक्षय भैय्या सोनवने यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.