केज :- केज तालुक्यातील आवसगाव येथील रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी येथील नागरिकांनी केज तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील आवसगाव येथून जाणारा आवसगाव ते सावळेश्वर आणि आवसगाव ते बनसारोळा हे दोन रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. या दोन्ही रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. यामुळे येथील शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याने दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णांना प्रचंड त्रास आणि हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी दि. ६ ऑक्टोबर रोजी येथील युवा कार्यकर्ते प्रदीप काळे आणि अविनाश साखरे यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शिनगारे, सुजय शिनगारे, परमेश्वर साखरे आणि उत्तरेश्वर साखरे यांच्यासह युवक उपोषणाला बसले आहेत.