बीड । प्रतिनिधी
ओबीसी समाजाची बुलंद तोफ तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये ओबसी समाज बांधवांचा मराठवाडा विभागीय महामेळावा होत आहे. या मेळाव्याला बीड जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. ते बीडमध्ये काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांच्या अयोजित बैठकीत बोलत होते.
ओबीसी समाजाचा विभागीय मेळावा दिनांक 8 ऑक्टोंबर शनिवार रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होत आहे. त्यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बीडमध्ये कँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. पुढे बोलतांना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, ओबीसी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी हा विभागीय महामेळावा होत आहे. त्यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून ओबीसी समाजाची बुलंद तोफ तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा माजी मंत्री अशोकराव दादा पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री विजय वडेट्टीवार, ओबीसी विभागाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.भानुदासजी माळी, यांच्या उपस्थितीत होत आहे. तरी मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, ओबीसी विभाग व काँग्रेस पक्षाचे इतर सर्व सेल व विभागाचे जिल्हा, शहर, तालुका पदाधिकारी यांच्यासह सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जिल्हध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे. या बैठकीला ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ बापू थोटे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ठोंबरे, केज नगरीचे उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजीराव जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.