औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील शेतकरी कौतिकराव श्यामराव दिवटे ( ५५ ) या शेतकऱ्याने खासगी बँकच्या कर्जाचा बोजा , वारंवार होणारी नापिकी , शासकीय योजनेचा वारंवार अर्ज करूनही कोणताच लाभ मिळत नसल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . कौतिकराव यांना गावातच एक ते दीड एकरच्या जवळपास शेती होती . कुटुंबाच्या किमान गरजा भागवण्याएवढीही मिळकत नव्हती शिवाय कर्जाचा बोजा वाढल्याने त्यांनी नैराश्यात हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले . मृत कौतिकराव यांच्या पश्चात दोन मुले , दोन मुली , पत्नी , आई असा परिवार आहे