चिखली गावात झालेली बोगस कामे ओपन होऊनय व मी मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य असल्याने मला विश्वासात घेत नाहीत - राहूल शिरोळे

पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय चिखली येथील सरपंच व ग्रामसेवक भोपळे यांनी कागदोपत्री सर्व मासिक सभा घेऊन त्या सभा झाल्याचे फक्त कागदोपत्री काल्पनिक पद्धतीने मांडणी करुन दाखवल्या आहेत. वास्तविक पाहता चिखली ग्रामपंचायत मध्ये सदस्य यांना कसलीही चर्चा न करता सभा घेतात मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्या समोर प्रोसिडींग वाचन केले जात नाही व मागील प्रोसिडींग रजिस्टरची गेल्या तीन महिन्यापासून मागणी करुनही ग्रामपंचायत सदस्याना मासिक सभेचे व खर्चाचे रजिस्टर माहिती दाखवली जात नाही.मासिक सभेचे व खर्चाचे रजिस्टर पाहण्यास मागितल्यास रजिस्टर ऑनलाईन ला गेले आहे.असे उडवा उडवीचे उत्तरे ग्रामसेवक देत असून मागील काही महिन्या पासून ग्रामसेवक आशेच उत्तर देतात 

मासिक सभेच्या दिवशी किंवा इतर वेळी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने रजिस्टर पाहण्यास मागणी केल्यावरही रजिस्टर हे ऑनलाईनलाच गेलेली आहेत हेच उत्तर देर वेळेस देण्यात येते आहे.

ग्रामसेवकाने दिलेल्या मासिक सभेच्या नोटिस प्रमाणे चिखली येथील ग्रामपंचायत मासिक सभा झालेली नाही.मासिक सभेत सदस्याचे मनने आयकुन घेतले जात नाही तसेच मला रजिस्टर ही दाखवले जात नाहीत हा सर्व प्रकार माझ्यासोबत होत आहे तर का? मी जातीने मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे फक्त ह्या वेळेस नाहीतर दरवेळी आशीच घटना घटत आहे. मासिक सभेसाठी मी वेळेत हजर असतो त्यावेळेस मासिक सभेच्या रजिस्टरवर सुरुवातीला कोरमपूर्तीसाठी / उपस्थित सदस्याच्या सह्या घेतल्या जातात त्यावेळेस होणारी सही ही कोरमपूर्ण करणेसाठी केलेली असते त्यावेळेस कोरमपूर्ण न झाल्यास म्हणजेच सभेस आवश्यक असलेली सदस्य संख्या नसल्यास सभा रद्द केली पाहिजे. माझ्यासमोर सरपंच सुरवसे यांच्या काळात कोरमपूर्ती कधीच झाली नाही त्यामुळे माझ्यासमोर सभा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु आतापर्यत सरपंच व ग्रामसेवक है संगनमत करुन मी मासिक सभेसाठी हजर कोरमपूर्ती साठी केलेल्या सहीच्या आधारे जणू काही 7 माझ्यासमोर मासिक सभा झाल्यात व त्यास माझी मान्यता आहे असे बनावट सभा दाखवून सरपंच व ग्रामसेवक यांच्या कल्पनेतून झालेल्या काल्पनिक सभा दाखवल्या आहेत तसेच मासिक सभेतील माझे सुचक / अनुमोदक हे नाव त्यांनी आतापर्यत माझ्या परस्पर टाकलेली आहेत. सभेतील ठरावास सुचक / अनुमोदक असण्याचा माझा कसलाही संबंध नाही. मागणी केल्यावर मला कधीही प्रत्यक्षात रजिस्टर पहायला मिळाली नाहीत. मला सुचक 7 अनुमोदक केल्याची माहिती मला मी केलेल्या माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये केलेल्या अर्जातून मिळालेल्या माहिती च्या आधारे मला समजली. मासिक सभा काय अधिकारी याबाबतच्या तक्रारी माझ्या सुरुवाती पासूनच्या आहेत. हा घडत आलेला प्रकार उघडकीस यावा यासाठी मी वेळोवेळी पंचायत समिती कार्यालय, पाटोदा समोर आंदोलन तसेच तक्रारी अर्ज करुन प्रशासन योग्य दखल घेत नसून कार्यालयाकडून योग्य चौकशी न झाल्यामुळे झालेला व होत असलेला प्रकार उघड होत नाही यासंबंधीचे पुरावेही माझ्याकडे आहेत. आपल्या कार्यालयाकडून योग्य चौकशी होत नसल्यामुळे असे प्रकार करण्यास सरपंच व ग्रामसेवक यांना पाठबळ मिळत आहे. ह्या मुळे आपणास कळविण्यात येते की, माझ्यासमोर नियमाप्रमाणे मासिक बैठक न घेणे, मासिक सभेत माझ मत विचारात न घेणे, मासिक सभेस आवश्यक रजिस्टर न दाखवणे, मासिक सभेतील ठरावास माझे परस्पर सुचक अनुमोदक म्हणून नाव टाकणे, माझा हक्क नाकारणे, मला ग्रामपंचायत कामासंबंधी कसलीच माहिती न देणे, कोरमपूर्ती सध्याचा आधार घेत मासिक सभेत माझ्यासमोर चर्चा झाल्याचं दाखवणे हा सर्व प्रकार माझ्यासोबत घडण्याचे एकमेव कारण आहे म्हणजे मी फक्त मागासवर्गीय जातीतील सदस्य आहे त्यामुळे असा प्रकार माझ्यासोबत घडत आलेला आहे आणि घडतही आहे. यामुळे निवेदनाद्वारे कळवण्यात येते की, सदरील निवेदनात केलेल्या आरोपाची सखोल व योग्य चौकशी व्हावी चौकशीस ग्रामसेवक, सरपंच (ओरिजिनल सरपंच असावेत सरपंचाचा मुलगा नाही ). उपसरपंच व सदस्य (ओरिजिनल सदस्य असावेत सदस्याचे नातेवाईक नसावेत) तसेच होणान्या चौकशीस मला माझे मत. कॉस प्रश्न करण्याचा व पुरावे मांडण्याचा अधिकार असावा. सदरील चौकशी

व्हिडियो रेकॉर्डिंग मध्ये घेण्यात यावी.मी आतापर्यंत आपल्या कार्यालयाकडे केलेल्या सर्व तक्रारी निवेदन व त्यातील प्रत्येक ओळ. प्रत्येक शब्द खरा आहे परंतु हे सिद्ध न होण्याच कारण आपल्या कार्यालयाचे चौकशी अधिकान्याने त्यांच्या सोयीनुसार केलेली गोलगोल चौकशी, अर्धवट चौकशी, सोयीनुसार विचारलेले प्रश्न, सोयीनुसार लावलेला अर्थ तसेच आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये घडत असलेल्या प्रकाराबद्दल ग्रामपंचायत सदस्याची न कैलेली चौकशी ग्रामपंचायत कार्यालय चिखली ता. पाटोदा या ग्रामपंचायत ची निवेदनात नमूद मुद्दयाप्रमाणे चौकशी न झाल्यास दि. 27/10/2022 पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोन करण्यात येईल याची नोद घ्यावी. तसेच आपण चौकशी न केल्यामुळे काही अनुचित घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची गंभीररीत्या नोंद घ्यावी आशे निवेदणाद्वारे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,मुख्य अधिकारी बीड यांच्या सह आयुक्त कार्यालयाला चिखली ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे यांनी दिले आहे